HOME / NEWS / परिक्रमा शैक्षणिक संस्थेत अध्ययनाचे कार्य अखंड सुरूच
परिक्रमा शैक्षणिक संस्थेत अध्ययनाचे कार्य अखंड सुरूच
Written by Sarvmat Digital on 2020-10-07
लॉकडाउन च्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परिक्रमा शैक्षणिक संकुल अंतर्गत असलेल्या इंजिनीरिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, एम बी ए, तंत्रनिकेतन, कनिष्ठ महाविद्यालय व CBSC शाळा या सर्वच संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जात आहे. प्रचलित खडू आणि फळा या ऐवजी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्ययनाचे धडे देत असल्याची माहिती परिक्रमा संकुलाचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली आहे.
परिक्रमेचे सर्वच शिक्षक हे टेक्नोसॅव्ही असल्यामुळे झूम मीटिंग चा वापर करून विद्यार्थ्यांना नियमित वेळापत्रकानुसार शिकवले तसेच गुगल क्लासरूम चा वापर करून सर्व विषयांच्या नोट्स देऊन ऑनलाईन सर्व परीक्षा घेतल्या जेणे करून विद्यार्थ्यांची पुणे विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी झाली. प्रत्येक वर्गाचा व्हाट्स अप ग्रुप करून विद्यार्थ्यांना नोट्स, विडिओ लेक्टर, मॉडेल अन्सर पेपर देऊन विद्यर्थ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.
या उपक्रमास विद्यार्थी आणि पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने संस्थेचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना निवेदन केले कि आपण जेथे आहेत तेथेच राहून घरातून काम करा व कोरोना पासून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. याकामी सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे सहकार्य लाभत आहे